विदर्भ साहित्य संघ वरोरा शाखेतर्फे मा. डाँ. रविंद्र शोभणे यांचा सत्कार..वरोरा... जगदीश पेंदाम
 
 अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मा.डाँ. रविंद्र शोभणे नागपूरचे कादंबरीकार लेखक आणि साहित्यिक यांची निवड झाल्याबद्दल वरोरा शाखा विदर्भ साहित्य संघाच्या वतीने त्यांचा छोटेखानी पुष्पगुच्छ व पुस्तक देवून 'कवितेचे घर' शेगाव (बु) येथे पार पडलेल्या राष्ट्रीय काव्य पुरस्कार सोहळ्यात विदर्भ साहित्य संघाच्या सर्व पदाधिकारीच्यां वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
  या सत्कार सोहळ्याप्रसंगी विदर्भ साहित्य संघ नागपुरचे अध्यक्ष प्रदीप दाते, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण उपसंचालक मा. उल्हास नरड, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त बालसाहित्यीक मा. एकनाथ आव्हाळ ( मुंबई) 'कवितेचे घर' चे संस्थापक अभियंता श्रीकांत पेटकर, किशोर पेटकर, व महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील सर्व नामांकित साहित्यिकांची उपस्थिती होती.    विदर्भ साहित्य संघाचे सचिव प्रा. नीरज आत्राम, विदर्भ साहित्य संघाचे प्रसिद्धी प्रमुख आचार्य पुरस्कार प्राप्त परमानंद तिराणिक, उपाध्यक्ष सिमा वैद्य, ज्योती चन्ने, जितेश कायरकर, आरती रोडे, हे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. अध्यक्ष पदाचा मान परत एकदा विदर्भाला मिळाला असल्याने तो आनंद साजरा करण्यासाठी वरोऱ्यातील विदर्भ साहित्य संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मा.डाँ रविंद्रजी शोभणे सरांची भेट घेवून त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील उपक्रमाबद्दल सविस्तर चर्चा केली...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]