वरोरा शेगाव. अर्जुनी तु कोकेवाडा बस सुरू.. नागरिक,शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

वरोरा शेगाव. अर्जुनी तु कोकेवाडा बस सुरू..
 नागरिक,शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

शेगाव( जगदीश पेंदाम)

गेल्या अनेक वर्षपासून नियमित सुरू असलेली वरोरा शेगाव अर्जुनी तु कोकेवाडा ही बस कोरोणा महामारी  च्या काळा पासून बंद झाली होती. गेले तीन वर्ष लोटून ही बस सुरू न झाल्याने कोकेवाडा अर्जुनी या ग्रामीण भागातील जनतेला तसेच विद्यार्थ्याला फार मोठा मानसिक शारीरिक तसेच आर्थिक त्रास सहन  करावा लागत होता तसेच मुख्य बाजारपेठ असलेल्या शेगाव बू. तसेच तालुका असलेल्या वरोरा येथे नियमीत महत्त्वाच्या काम करता बस सोयीस्कर असल्यामुळे याचा फायदा नागरिकांना होत होता,त्यामुळे होणाऱ्या मानसिक शारीरिक त्रासाची दक्षता घेऊन तसेच  विद्यार्थ्यांचे शेक्षनिक नुकसान होत असलेले लक्ष्यात घेऊन ही बस सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी वारंवार   निवेदनातून अनेक व्यक्तींनी केली होती.।
दिवाळीनंतर याची दखल घेत वरोरा डेपो मॅनेजर यांनी दिनांक 9 नोव्हेंबर पासून सकाळ, संध्याकाळ ही बस सुरू करण्यात आली असून बस सुरू झाल्याने कोकेवाडा, अर्जुनी तुकुम,चारगाव येथील शालेय शिक्षण विद्यार्थी नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे...।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]