सरदार वल्लभभाई पटेल काव्य स्मृती पुरस्कार २०२३ ने कवी नीरज आत्राम सन्मानित...


सरदार वल्लभभाई पटेल काव्य स्मृती पुरस्कार २०२३ ने कवी नीरज आत्राम सन्मानित...

 वरोरा...जगदीश पेंदाम

 भाग्योदय लेखणीचा साहित्य मंच, द्वारा आयोजित दुसरे राष्ट्रीय कवी संमेलन तसेच पुरस्कार सन्मान सोहळा  स्वामी नारायण मंदिर अक्षर महोल तिथंल ( समुद्र किनारी )वलसाड,गुजरात येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष  चंद्रकांत दादा वानखेडे,ज्येष्ठ साहित्यिक, उद्घाटक शरद चितोडकर वापी, स्वागताध्यक्ष  सुनील तात्या नेरकर धुळे,प्रमुख पाहुणे, गुलाबराजा फुलमाळी पुणे, कविवर्य प्रकाश फर्डे शहापूर,विशेष उपस्थिती मनोज पाटकर सुरत, डॉ. चंद्रकांत कोठावदे, मार्गदर्शक ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नयनचंद्र सरस्वते (माई )पुणे. या मंचाच्या संस्थापिका भाग्यश्री बागड, संयोजक, राकेश बागड,या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत सुंदर आणि अविस्मरणीय सोहळा पार पडला या कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष  चंद्रकांत दादा वानखेडे ज्येष्ठ साहित्यिक, यांचे शुभ हस्ते कवी,नीरज आत्राम वरोरा, जि.चंद्रपूर यांना "लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल काव्य स्मृती पुरस्कार २०२३" देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार देण्यामागचे कारण म्हणजे भाग्योदय लेखणीचा साहित्यिक मंचद्वारे या कार्यक्रमाचे आयोजक  कवी,प्रदीप बडदे नवी मुंबई, यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या काव्य स्पर्धेमध्ये ९० कवी,कवयित्री सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये नीरज आत्राम,वरोरा यांनी सर्वोत्कृष्ट क्रमांक पटकविल्याबद्दल त्यांना "लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल काव्य स्मृती पुरस्कार २०२३ " देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल कवी,नीरज आत्राम, यांच्यावर शैक्षणिक,साहित्यिक, सामाजिक अश्या सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]