लोकसभेच्या निवडणूकीत 'त्या' अभद्र युतीची चर्चा

लोकसभेच्या निवडणूकीत 'त्या' अभद्र युतीची चर्चा


18 व्या लोकसभेच्या पहिल्या टप्याच्या निवडणूकीचा प्रचार येत्या काही तासात संपणार नाही. यंदाच्या निवडणूकीत कोण येणार? कुणाची सरशी आहे? यावर चौका—चौकात चर्चा सुरू आहे.  या निवडणूकीत सर्वसामान्यांच्या हातात, मोबाईल आल्यांने, कुणापासून काहीही लपून राहत नाही.  त्यामुळे असलेल्या माहीतीची चर्चा या निवडणूकीच्या माध्यमातून होत आहे.  राजूरा विधानसभेत कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या अभद्र युतीची चर्चा आता उघडपणे केली जात असून, त्या निवडणूकीत कॉंग्रेसने शेतकरी संघटनेला दिलेली अस्पृष्यतेची वागणूकीचा बदला घेण्यांची संधी शेतकर्यांना मिळाल्याची चर्चा आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत वामनराव चटप यांना सत्ता मिळून त्यांची ताकद वाढू नये याकरीता कॉंग्रेसने त्यांचे कट्टर विरोधक भाजपा सोबत हातमिळवणी केली होती. सत्तेत येण्याकरीता, भाजपावर तुटून पडणारे उमाकांत धांडे सारखे कट्टर कॉंग्रेसी नेतेही या निवडणूकीत विजयाकरीता भाजपासोबतच्या युतीत सहभागी झाले होते.  शेतकरी संघटनेला कॉंग्रेससोबत जायचे होते, तसा प्रस्तावही चटप समर्थकांकडून गेला असल्याची माहिती आहे.  मात्र चटप सत्तेत आल्यास, विधानसभेत आपल्याला 'जड' जाईल अशी भिती आमदार सुभाष धोटे यांना वाटल्यांने, त्यांनी शेतकरी संघटनेचा प्रस्ताव धुळकावित, भाजपासोबत घरोबा केला.  या अभद्र आणि अनैसर्गीक युतीवरून त्यावेळी प्रचंड नाराजी निर्माण झाली होती.
 आता कॉंग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांचे उमेदवारीवरून, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीचा बदला शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते घेतील अशी चर्चा जोर धरू लागली आहे.  वामनराव चटप यांनीही, कॉंग्रेस नंबर एक शत्रु तर भाजपा हा दोन नंबरचा शत्रु असे जाहीर सांगत आपला पाठींबा अप्रत्यक्ष कुणाकडे? याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]