मूलचा मालधक्का: दोन नेत्यांच्या दोन तर्‍हा

मूलचा मालधक्का: दोन नेत्यांच्या दोन तर्‍हा



मागील वर्षी मूल शहरावर, तालुक्यात मोठे संकट आले होते. गुड मार्निंग ग्रुपने पुढाकार घेतल्यांने आणि समस्त मूल वासीयांनी एकीचे दर्शन दिल्यांने, मालधक्क्याचे मोठे संकट टळले आणि मूल वासीयांनी सुटकेचा श्वास घेतला.

मूल रेल्वे स्टेशनवर सुरजागड येथील लोह खनिज वाहतूकीसाठी मालधक्का झाले असते तर, हजारो हायवाची वाहतूक, लोह, खनिजाची वातावरणातील धुळ पसरून मूल शहरत प्रदुषणाच्या​ विळख्यात सापडणार होते. भरधाव येणार्‍या वाहनामुळे अपघाताची संख्याही वाढण्याची भिती होती. स्मार्ट बनत असलेल्या मूल शहरावरील आलेले संकट दूर करण्याकरीता गुड मार्निंग ग्रुप आणि नंतर, मूल शहर बचाव समितीने केलेल्या कार्यामुळे दूर झाले. मात्र हे कार्य करीत असतांना दोन नेत्यांच्या दोन तर्‍हा आम्हाला अनुभवायला मिळाले.

दिवगंत खासदार बाळूभाऊ धानोरकर

सुरजागड प्रकल्प आणि मूल येथील मालधक्का यांचा संबध सत्तारूढ भाजपाशी असल्यांने, हा मुद्दा रेल्वेशी आणि केंद्र सरकारशी संबंधित असल्याने मूल येथील मालधक्का रद्द करावा याकरीता, कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांची मदत घ्यावी असा काहीनी सूर काढला. बाळूभाऊची तारीख आणि वेळ निश्चित करून, मालधक्का हटावच्या मूलच्या कार्यकर्त्यानी चंद्रपूर येथील आकाशवानी परिसरात असलेल्या बाळूभाऊच्या अलिशान बंगल्यात भेट घेतली. मूलच्या मालधक्याची समस्या बाळूभाऊनी समजून घेतली. मालधक्का विरोधात मूल येथे आम्ही काढत असलेल्या मोर्चात सहभागी होण्यांची त्याना विनंती केली. त्यांनी  जवळच असलेल्या राजबीर यादव (रेल्वे उपभोक्ता  समिती सदस्य) यांना बोलावून, रेल्वेच्या महाप्रबंधकांसोबत पुढील आठवड्यात बैठक लावण्यांची सुचना दिली. (हेच राजबीर यादव पुढे संतोष रावत यांचेवरील गोळीबाराचे आरोपी  म्हणून पोलिसांचे ताब्यात आले) ''राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा असल्यांने मला पायी चालण्यांचा सराव करावयाचा आहे, चंद्रपूर ते सावली अशी कॉंग्रेसची पदयात्रा आहे, मी चिचपल्ली ते मूल येथे या पदयात्रेत येत आहे, तुम्ही चिचपल्ली येथे या, आपण मूलचा मालधक्का चिचपल्ली येथे कसे करता येईल याची पाहणी करू'' असे खासदार धानोरकर यांनी आम्हाला सांगीतले.

पुढे मात्र याबाबत काहीही झाले नाही.  राजबीर यादव यांनी नागपूरचे महाप्रबंधक यांचेसोबत बैठक आयोजीत केली नाही किंवा खासदार धानोरकर हे चिचपल्ली येथेही आले नाही. मोर्चात सहभागी झाले नाही किंवा या विषयावर एक चकार शब्दही काढला नाही!


नामदार सुधीर मुनगंटीवार

मूल येथे मालधक्का विरोधात प्रचंड मोठा मोर्चा निघाला.  शालेय विद्यार्थीनीसोबतच मूल शहरातील सर्व व्यापारी, सर्वपक्षीय नेते, सामाजीक कार्यकर्ते, पत्रकार सहभागी झालेत.  यानंतर , पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रश्नावर चर्चा करण्याकरीता, वनभवन नागपूर येथे बैठक बोलाविली.  या बैठकीत, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, सुरजागड प्रकल्पशी संबधीत अधिकारी, वनविभागाचे अधिकारी, गुड मार्निंग ग्रुपचे सदस्य, मूल शहर बचाव समितीचे सदस्य, राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत, नाम. सुधीर मुनगंटीवार यांनी, रेल्वेच्या अधिकार्यास स्पष्ट सुचना दिली, 'कोणत्याही परिस्थितीत मूल शहरात मालधक्का होणार नाही, करू देणार नाही, दुसरी जागा पहा, नविन जागा पाहण्याकरीता विजय सिध्दावार, संध्याताई गुरूनुले यांची सुचना लक्षात घ्या. आवश्यक असेल तर वनविभागाचे जागेसाठी वनविभागानी मदत करावी.

नाम. मुनगंटीवार यांनी स्पष्ट भूमिका घेतल्यांने, मूल शहरावरील संकट टळले. सुरजागडच्या अधिकारीने पालकमंत्री मुनगंटीवार यांचे आदेशानंतरही मालधक्का करण्याच्या हालचाली सुरू केल्या, मात्र प्रभाकर भोयर यांनी परत पालकमंत्री मुनगंटीवार यांना याबाबत माहीती देताच, मुनगंटीवार यांनी दम दिल्यानंतर, चालू केलेले काम बंद झाले. मूलचा श्वास मोकळा झाला. 

एकाच प्रश्नावर दोन नेत्यांच्या दोन तर्‍हा आम्हाला एकाच महिण्यात अनुभवता आले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]