एसडीओ देणार जन्म मृत्यू नोंदचे आदेश - कोर्टात जाण्याची गरज नाही

एसडीओ देणार जन्म मृत्यू नोंदचे आदेश - कोर्टात जाण्याची गरज नाही
सावली - एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला पण जन्म किंवा मृत्यूची नोंद झाली नसेल तर उपविभागीय अधिकारी यांचे आदेशाने नोंदणी होईल. आता न्यायालयात जाण्याची गरज नाही.
      प्रत्येक शासकीय कामासाठी जन्म- मृत्यू दाखल्याची गरज असते परंतु एकादेवेळी नोंदणी करायचे विसरले असल्यास तालुका न्यायालयात अर्ज दाखल करावे लागत होते. या प्रक्रियेत वेळ व पैसा खर्च होत होता. भारत सरकारच्या विधी व न्याय विभागाने यात सुधारणा करून 11 ऑगष्ट 2023 चे राजपत्रात जन्म- मृत्यू नोंदणी करण्यास एक वर्षापेक्षा जास्त विलंब झाल्यास नोंदणी करण्याचे आदेश देण्याचा अधिकार उपविभागीय दंडाधिकारी यांना दिला आहे. उपविभागीय दंडाधिकारी हे सहानिशा करून संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका यांना जन्म - मृत्यू नोंदणी करण्याचे आदेश देतील. याबाबत कार्यवाही करण्याचे पत्र चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयातून सर्व उपविभागीय दंडाधिकारी यांना दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]